बारामती : इन्स्टाग्रामवरची मैत्री पडली महागात , लग्नाचे आमिष दाखवत केले लैंगिक शोषण

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर  टिम ----
बारामती प्रतिनिधी  

इन्स्टाग्रामवर झालेली ओळख एका वीस वर्षीय तरुणीला महागात पडली आहे तिला लग्नाचे आमिष दाखवून. लैंगिक शोषण केल्याप्रकरणी   बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये  युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे  .

झारगडवाडी येथील युवक अविनाश गुलाब मासाळ नाव असून वय २२  वर्ष धंदा एमआयडीसीत नोकरी  त्याची पीडित मुली (वय २०) बरोबर  राहणार फलटण तिच्यासोबत इंस्टाग्राम वरून नऊ महिन्यांपूर्वी ओळख झाली. 

इंस्टाग्राम वरून संवाद साधत असताना प्रत्यक्ष मुलाखत झाली. मुलाखतीमध्ये प्रेमाच्या गोष्टी झाल्या आणि त्यातून त्यांचे शारीरिक संबंध आले युवकाने पीडित महिलेला लग्नाचे आमिष देऊन तिचे लैंगिक संमती मिळवली. आणि आता लग्नाचे गोष्ट केली असता सदर युवक त्या मुलीला धमकी देऊ लागला व लग्न करण्यास नकार दिला.

 त्यांची भेट बारामतीमध्ये लॉजला झाल्याने सदर विरुद्ध भादवि कलम 376 प्रमाणे व कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पालवे हे करत आहेत.
To Top