वाई : दौलतराव पिसाळ
किसनवीर सहकारी कारखाना वाचविण्यासाठी व तो सहकारात ठेवण्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे. शेअर्स खरेदीसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सभासदांना अल्पदराने १५ हजार रुपयांचे मध्यमुदत कर्ज देण्यात येणार आहे. त्यासाठी सोसायटीचे सचिव, विकास अधिकारी, कारखान्याचे कर्मचारी व कारखाना संचालक गावोगावी बैठका घेवुन मदत करणार आहेत. या कामाचा आज दि. १५ रोजी कवठे येथुण सायंकाळी ६ वाजता शुभारंभ होत असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष व कारखान्याचे नुतन संचालक नितीन पाटील यांनी दिली.
येथील जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयातील कै.लक्ष्मणराव पाटील सभागृहा आज किसनवीर कारखान्याचे वाई तालुक्यातील नवनिर्वाचित संचालक सर्व विकास सेवा सोसायटीचे सचिव कारखान्याचे शेती अधिकारी कारखान्याचे अधिकारी तसेच जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. त्या वेळी नितीन पाटील बोलत होते. यावेळी कारखान्याचे नूतन संचालक शशिकांत पिसाळ, प्रमोद शिंदे, दिलीप पिसाळ, किरण काळोखे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, शिवाजी जमदाडे, सत्यजित वीर, संजय कांबळे, कारखान्याचे एमडी शिंदे, शेती अधिकारी विठ्ठल कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
नितीन पाटील पुढे म्हणाले, किसनवीर कारखाना हा शेतकर्यांच्या मालकीचा राहण्यासाठी आता सभासद शेतकर्यांनी पुढे आले पाहिजे. ज्या शेतकऱ्यांचे सभासदांचे भागभांडवल अपूर्ण असेल तसेच नूतन शेअर्स खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकास सेवा सोसायटय़ांमधून १५ हजार रुपये कर्ज अल्प दरामध्ये पाच वर्षांच्या मुदतिवर देण्यात येणार आहे. तसेच ज्यांची शेअर्स कारखान्यावर अशा सभासदांनाही याचा लाभ घेता येणार आहे. या माध्यमातून सुमारे १०० ते १५० कोटी भागभांडवल उभा करण्याचा मानस आहे. यासाठी कारखान्याचे संचालक आपल्या गटातील गावोगावी बैठका घेणार आहेत. त्यांना विकास सेवा सोसायट्यांचे सचिव विभागीय विकास अधिकारी व कारखान्याचे कर्मचारी मदत करणार आहेत.
या कामाचा शुभारंभ मकरंद आबा यांच्या जन्मगावी खोटे होतो आज सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात येणार असल्याचेही नितीन पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमास जिल्हा बँकेचे विकास अधिकारी संजय मांढरे, संजय जाधव, मोहित जाधव, प्रशांत शिंदे, विशाल सुतार, गणेश आंबिके, अमोल सोनवणे, मनोज शिंगटे तसेच विकास सेवा सोसायटीचे सत्तेचाळीस सचिव, कारखान्याचे स्लीप बाँय तसेच कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.