सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी
ग्रामपंचायत केंजळ व गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल वाई यांच्या वतीने डॉ.जयघोष कद्दू यांचे स्मरणार्थ मोफत सर्व रोग निदान शिबीर केंजळ येथे आयोजीत करण्यात आले.सरपंच मिलन गायकवाड यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी इ सी जी , ब्लड प्रेशर , शुगर तपासणी मोफत करण्यात आली. पेशंटना मोफत औषधे देण्यात आली.
डॉ.सुजाता इंगुळकर व डॉ.सुरज महांगडे यांनी गीतांजली हॉस्पिटलच्या विविध योजनांची माहीती दिली .महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना , इ एस आय सी , कॅशलेश मेडीक्लेम , तसेच आय सी यु , सी सी यु , डायलिसिस कॅथलॅब , सीटी स्कॅन व एम आर आय यांची माहीती दिली.
उपसरपंच अमोल कदम यांनी हॉस्पीटलच्या सर्व स्टाफचे स्वागत केले. व सर्व ग्रामस्थांनी या शिबीराचा लाभ घेण्याचा आवाहन केले. केंजळ गावाच्या ११४ ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला . यावेळी ग्रामपंचायत सदस्य निलेश जगताप यांनी ग्रामपंचायत च्या वतीने आभार मानले.व हॉस्पीटलच्या वतीने जमीर इनामदार यांनी आभार मानले. यावेळी जयंत येवले , माजी सरपंच धोंडीबा जगताप , मा.सरपंच बाजीराव येवले , सोसायटी संचालक विशाल जगताप ,शामराव जगताप , बाळुमामा जगताप , मानसिंग जगताप सी आर पी.प्राजक्ता कदम , आशा स्वयंसेविका सौ.मंगल सावंत ,.मनिषा संकपाळ , हॉस्पीटलचे जमीर इनामदार , गणेश येवले , अपर्णा सिस्टर ,पुजा सिस्टर, निलेश ब्रदर , मोहीत फरांदे , हेमाली कदम , अवघडे मावशी , पुरब शहा ह उपस्थित होते.