सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
भोर : प्रतिनिधी
भोर,वेल्हा तालुक्यातील दुर्गम डोंगरी तसेच खडकाळ असल्याने दरवर्षी अतिवृष्टी होऊनही सखोल भागाकडे पूर्णतः पाणी वाहून जाते तर पाणी साठवण होत नाही.परिणामी या दुर्गम भागाला वर्षभर तसेच उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.मात्र या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून आमदार संग्राम थोपटे यांनी विशेष प्रयत्न करीत १७ साठवण बंधाऱ्यासाठी ६७ कोटी ५९ लाख ७४ हजार ४४३ रुपये निधी मंजूर केला आहे.
या बंधाऱ्यांच्या माध्यमातून भोर,वेल्ह्याच्या दुर्गम भागतील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येणार असल्याने शेतकरी शेतकरी सदन होणार असल्याचे आमदार थोपटे यांनी माहिती दिली. या विकास भोर तालुक्यातील हरिष्चंद्री, हरिष्चंद्री नं.१ हरिष्चंद्री नं.३, कांजळे काळडोह ,अंगसुळे कोरले व्याहळी ,देगाव कुंडीचा ओढा,देगाव नं.१ गाढव मळा तर वेल्हे तालुक्यातील वेल्हे ,वेल्हे पंचायत समिती जवळ ,चिरमोडी, कोदवडी ,सोंडे सरपाले, घावर, कोलंबी पूलाजवळ तसेच वरोती येथील बंधाऱ्यांचा समावेश आहे.हे सर्व बंधारे १०० हेक्टर सिंचन क्षमतेचे असून लवकरच बंधाऱ्याचे काम सुरू होऊन एक वर्षात पूर्ण होणार आहे.त्यामुळे भविष्यात भोर व वेल्हा तालुक्यातील दुर्गम भागात बागायत क्षेत्र तसेच उसाच्या क्षेत्रात वाढ होईल.नवीन साठवण बंधाऱ्यासाठी मृद व जलसंधारण विभागाने तातडीने निधी मंजूर केल्याने मंत्री शंकरराव गडाख यांचे आमदार थोपटे पत्रकार परिषदेत विशेष आभार मानले.