बारामती : विविध कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

Pune Reporter


 

सोमेश्वर रिपोर्ट  टिम       

बारामती प्रतिनीधी

बारामती तालुक्यात सुरु असणाऱ्या विविध विकासकामांची  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. विकासकामांची गती वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

            पवार यांनी आज  मौजे कन्हेरी येथील रस्त्याचे काम, शिवसृष्टीचे काम, फळ रोप वाटिका, वातानुकूलित पॉलिहाऊस, वनविभागाचे वन उद्यान, सुरक्षा केबिन, बांबू कुटी, वृक्ष लागवड,  गौतमनगर, नक्षत्र गार्डन आणि  जळोची येथील रस्त्याच्या कामांची पाहणी  केली.

              यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपवनसंरक्षक राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, तहसिलदार विजय पाटील,  मुख्याधिकारी महेश रोकडे,  गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल   तसेच  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

                पवार  म्हणाले,  शिवसृष्टीचे काम उत्तम दर्जाचे होईल यासाठी प्रयत्न करावे.  कन्हेरी येथील वन उद्यानाच्या हद्दीशेजारील शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी जागा देऊन सहकार्य करावे. फळ रोप वाटिकांतर्गत रस्त्याचे काम आकर्षित करावे. रस्त्याच्या दुतर्फा चांगली झाडे लावावीत, अशाही सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

     वन्यजीव जल पाणवठ्यासाठी पाणी टँकरचे उद्घाटन

       वसंतनगर बारामती येथील ओंकार जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जाधव  मित्रपरिवाराच्यावतीने  बारामती तालुक्यातील २५ पाणवठ्यावर  चार टँकरद्वारे   पाणी पुरवठा  करण्यात येणार आहे. या पाणी टँकरचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

To Top