'सोमेश्वर'च्या कार्यक्षेत्रातुन ही तीन गावे होणार गायब...! तब्बल ६२८ सभासद जोडले जाणार 'माळेगाव'ला : 'सोमेश्वर'ची ७० वर्षांची नाळ तोडताना भरून येतंय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अंजनगाव, जळगाव कप व जळगाव सूप ही तीन गावे सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून वगळून ती माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्राला जोडली जातील याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच सूतोवाच केले आहे. 

           माळेगाव कारखान्यांची विस्तारवाढ झाल्याने संबंधित कारखान्याच्या सोयीनुसार तसेच ऊस ठरेल अशा पद्धतीने कार्यक्षेत्र वाढवावे. बारामती तालुक्यातील जळगाव, अंजनगाव आदी गावांचा मालेगावच्या कार्यक्षेत्रात समावेश करावा, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. 

        माळेगाव (ता. बारामती) येथे आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. सध्या उसाचे क्षेत्र वाढत असून, काही कारखान्यांचेदेखील विस्तारीकरण झाले आहे. त्यानुषंगाने संबंधित कारखान्यांनी काही गावांचा समावेश करणे गरजेचे आहे. माळेगाव कारखान्याची विस्तारवाढ झाली असून, लागणारे उसाचे क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. यापूर्वी माळेगावने कार्यक्षेत्रामध्ये पाच गावांचा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कारखान्याला जवळचे असणारे अंजनगाव, जळगाव आदी गावांचा समावेश माळेगाव कारखान्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रात करावा, अशी सूचना अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांना केली. तातडीने या गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सभासद करून घ्यावे, असे सांगितले. तसेच सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनीदेखील सहकार्य करावे, असे नमूद केले.

-------------------------

दिलीप परकाळे - सभासद सोमेश्वर कारखाना (अंजनगाव)
सोमेश्वर कारखाना स्थापनेपासून घरोघरी जाऊन शेयर्स गोळा केले. माझे वडील माजी संचालक रामचंद्र परकाळे यांनी सायकलवरून शेयर्स गोळा केले. कै. मुगुटराव आप्पा काकडे ते सद्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या कार्यकाळात आतापर्यंत आम्हाला कायम एक महिन्याची सवलत दिली गेली. ती सवलत माळेगाव कारखान्याला मिळेल का? मात्र उपमुख्यमंत्री अजित दादांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य राहील. 

--------------------------
कैलास जगताप - सभासद सोमेश्वर कारखाना (जळगाव)
सोमेश्वर करखान्याशी तसेच पदाधिकारी, अधिकारी यांच्याशी गेली सत्तर वर्षांचे ऋणानुबंध तोडताना भरून आल्यासारखं वाटतंय...सोमेश्वर कारखान्याने जळगाव ला संचालक पदाची संधी दिली नाही ती संधी माळेगाव कारखान्याला मिळेल का?
To Top