बारामती पश्चिम ! सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची 'एक हाक पक्षी संवर्धनाची'

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----------
सोमेश्वर नगर : प्रतिनिधी
पक्षी हे मानवी जीवनातील महत्वपूर्ण घटक आहेत. आपल्या परिसरात सकाळी उठल्या पासूनच वेगवेगळ्या पक्ष्यांचा वावर त्यांच्या मधुर स्वरांनी आपल्याला होत असतो. किटकांचा फडशा पाडून मानवी आरोग्यास पोषक वातावरण तयार करत कृषी उत्पन्न वाढीसाठी शत्रु किडींचा नाश करतात व आपल्याला मुबलक अन्नधान्य पुरवण्याची ही जबाबदारी पक्षी सांभाळत असतात.
            सध्याच्या वाढत्या उन्हाच्या परिस्थितीमुळे पक्ष्यांची अन्न व पाण्यासाठी वणवण होत आहे. परिसरातील बरेच पक्षी ही उष्णतेच्या तीव्रतेमुळे मृत्यूमुखी पडत आहेत, याच पार्श्वभूमीवर सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व प्राणिशास्त्र विभाग यांनी पक्षी संवर्धनासाठी "एक हाक पक्षी संवर्धनाची"  हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी पक्षांची अन्न व पाण्याची गरज पाहता त्यांच्या सोयीसाठी मातीची भांडी, प्लास्टिक बॉटल्स, नारळ कवच , या सारख्या टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ असे बर्ड फीडर्स तयार केले आहेत व ते  महाविद्यालयाच्या परिसरामध्ये व सोमेश्वर नगर मधील टेकडीवरच्या भागांमध्ये हे बर्ड फिडर्स लावलेले आहेत . यात पाणी व धान्यांची सोय करू वेळेचे वेळ ते सुस्थितीत राहतील याचेही नियोजन केले आहे.
          या उपक्रमात प्रा.राजेश निकाळजे प्राणीशास्त्र विभाग विभाग प्रमुख व कार्यक्रम अधिकारी रासेयो , प्रा अपूर्वा ताम्हाणे, प्रा शुभम ठोंबरे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख , प्रा पूजा कदम,  श्री अमित  काकडे यांनी नियोजन केले. तसेच या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. रामचंद्र पवार यांनी यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व प्राणिशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट बर्ड फिडर तयार करून हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडत पक्षी संवर्धन ही काळाची गरज आहे असे दिसते.
To Top