सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर (ता.बारामती) येथील श्रीरंग(बाळासाहेब) पांडुरंग साळवे यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम पाहिले. तसेच ते वडगाव निंबाळकर चे माजी उपसरपंच देखील होते. सामाजिक कार्य मार्गदर्शन सल्ले याकरता अग्रेसर असे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होते. याच्या पश्चात मुले, एक मुलगा श्रीकांत, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे.