सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
चोपडज विविध कार्य सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश सूर्यकांत गाडेकर व व्हाईस चेअरमनपदी अनिल विठ्ठल गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दिनांक 04/05/2022 वार बुधवार रोजी तहसील कार्यालयातील सहकारीसहाय्यक निबंधक कार्यालयात निवडीचा कार्यक्रम पार पडला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाटणे व त्यांचे सहकारी प्रभूने यांनी कामकाज पाहिले चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने दोन्ही बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आली निवडीनंतर चेअरमन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सायंकाळी सहा वाजता चोपडज येतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ढोल-ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतषबाजी सह भव्य मिरवणूक पार पडली ठीक आठ वाजता पंचदैवत मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला त्यानंतर त्या ठिकाणी विजय सभा घेण्यात आली त्या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन चा ग्रामस्थांतर्फेसत्कार करण्यात आला यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन चा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तीस वर्षापासून सोसायटीची निवडणूक झालेली नव्हती या निवडणुकीमध्ये विरोधी पॅनल चा सटवाई माता गावकरी पॅनलने १३/० असा पराभव पराभव करून वर्चस्व मिळविले व मोठ्या फरकाने विजय मिळवला या सभेचे सूत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी केले.
या वेळेस समीर गाडेकर उमेश गायकवाड राहुल गाडेकर संतोष गाडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार एडवोकेट इम्रान खान यांनी मानले यावेळेस बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते सर्व चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी सर्व ग्रामस्थांचे व संचालक मंडळाचे आभार मानले व दिलेली जबाबदारी ही सोसायटीच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले त्याप्रमाणे पॅनल विजयी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे शामराव पवारसागर गायकवाड संदीप गाडेकर बापूराव गाडेकर प्रमोद जगताप महिंद्र गाडेकर भानुदास साळुंखे गुरुजी सुधीर गाडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले