वाई ! 'किसनवीर'च्या निवडणुकीत भाजपचे पानीपत : सत्ताधारी पॅनेलचा २१/० ने धुव्वा, मदन भोसलेची १९ वर्षांची सत्ता मोडीत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व अनेक दिग्गज नेत्यांनी लक्ष घातलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलने मोठ्या मताधिक्याने जिंकली. 
         सत्ताधारी मदन भोसले यांचा 21/0 असा दारुण पराभव केला. भोसले गटाचे सहकारातील एकोणीस वर्षाचे वर्चस्व मोडीत काढत आमदार पाटलांनी कारखाना ताब्यात घेतला. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीस वाई औद्योगिक वसाहतीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात सकाळी 9 वाजता 77 टेबलवर प्रारंभ झाला. पहिल्या फेरीचा निकाल हाती येण्यास दुपारी 1 वाजला. पहिल्या फेरीमध्ये वाई व खंडाळा तालुक्याची मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये आ. मकरंद पाटील यांचे किसनवीर शेतकरी बचाव पँनेलने सुमारे 3500 ते 4000 चे मताधिक्य घेतले होते. दुपारी जावली, सातारा व कोरेगाव तालुक्याच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. साडेचार वाजता दुसर्‍या फेरीच्या पहिला निकाल हाती आला. यात सोसायटी मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील 147 मताधिक्याने विजयी झाले. वाई-खंडाळा तालुक्यापेक्षा सातारा, जावली व कोरेगाव तालुक्यातील मतदारांनी पाटील बंधूंना 5 हजार ते  6 हजारापेक्षा अधिकचे मताधिक्य मिळवून दिले. यामुळे किसनवीर शेतकरी बचाव पँनेलच्या विजयावर शिक्का मोर्तब झाले.
उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे कंसात मिळालेले मताधिक्य - आ. पाटील यांचे किसनवीर बचाव शेतकरी प़ँनेल कवठे खंडाळा गट - नितिन पाटील 22244 (9551), रामदास गाढवे 22155 (9702), किरण काळोखे 21716 (9200), विरोधी मदन भोसले गट शेतकरी विकास पँनेल दत्तात्रय गाढवे 12693, प्रविण जगताप 12453, प्रताप यादव 12516. एकुण झालेले मतदान 35287 बाद मते 479.
भुईंज गट शेतकरी बचाव पॅनेल प्रमोद शिंदे 21507 (8537), रामदास इथापे 21568 (8915), प्रकाश धुरगुडे 21679 (9313), शेतकरी विकास मदन भोसले 12970, जयवंत पवार 12653, दिलीप शिंदे 12366, झालेले मतदान 34900, बाद मते 866.
वाई बावधन जावली गट शेतकरी बचाव पॅनेल शशिकांत पिसाळ 22058 (9710), दिलीप पिसाळ 21359 (8522), हिंदुराव तरडे 21469 (8946), शेतकरी विकास पॅनेल चंद्रसेन शिंदे 12348, सचिन भोसले 12837, विश्‍वास पाडळे 12523, झालेले मतदान 32205 बाद मते 561.
सातारा गट - शेतकरी बचाव पॅनेल संदिप चव्हाण 22110 (9709), बाळासाहेब कदम 21833 (9157), सचिन जाधव 22036 (9850), शेतकरी विकास पॅनेल भुजंगराव जाधव 12401, चंद्रकांत इंगवले 12676, अनिल वाघमळे 12211. झालेले मतदान 35157 बाद मतदान 609.
कोरेगाव गट- शेतकरी बचाव पॅनेल सचिन साळुंखे 21532 (8745), ललित मुळीक 21567 (9160), संजय फाळके 21673 (9314), शेतकरी विकास पॅनेल मेघराज भोईटे 12787, नवनाथ केंजळे 12407, शिवाजी पवार 12359. झालेले मतदान 34929 बाद मते 837.
महिला राखीव मतदार संघ शेतकरी बचाव पॅनेल सुशिला जाधव 22394 (9516), सरला वीर 21562 (8599), शेतकरी विकास पॅनेल विजया साबळे 12878, आशा फाळके 12996, झालेले मतदान 35592, बाद मते 387.
अनुसूचित जाती जमाती शेतकरी बचाव पॅनेल संजय कांबळे 22724 (9726), शेतकरी विकास पॅनेल सुभाष खुडे 12998, झालेले मतदान 35722, बाद मते 378.
सोसायटी मतदार संघ शेतकरी बचाव पॅनेल आ. मकरंद पाटील 238 (147), शेतकरी विकास पॅनेल रतनसिंह शिंदे 91. झालेले मतदान 329 बाद 2.
भटक्या विमुक्त जाती जमाती शेतकरी बचाव पॅनेल हणमंत चवरे 22661 (9599), शेतकरी विकास पॅनेल चंद्रकांत काळे 13062, झालेले मतदान 35713 बाद मते 365.
इतर मागास प्रवर्ग शेतकरी बचाव पॅनेल शिवाजी जमदाडे 22610 (9515), शेतकरी विकास पॅनेल आनंदा जमदाडे 13095 झालेले मतदान 35705, बाद मते 395.
अपक्ष उमेदवार मानसिंग शिंगटे 75, दिलीप जाधव 62, रमेश माने 39, नवनाथ साबळे 61.  
निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण,  फटाक्यांची आतषबाजी व वाद्याच्या निनादात करत जल्लोष केला. डिजेच्या तालावर आमदार पाटील व नितीन पाटील तसेच विजयी उमेदवारांना खांदयावर उचलून घेत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच अनेकांना नेत्यांबरोबर सेल्फी घेण्याचा मोह टाळता आला नाही. यावेळी हौशी कार्यकर्त्याने दोन घोडे सजवून आणले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी शितल खराडे-पाटील, वाईचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, भुईंजचे एपीआय आशीष कांबळे, वाईचे एपीआय रवींद्र तेलतुंबडे, पीएसआय विजय शिर्के, कृष्णराज पवार व सहकार्‍यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.
निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जी. टी. खामकर, एम. के. रुपनवर, जे. पी. शिंदे, प्रिती काळे यांच्यासह 350 कर्मचारी कार्यरत होते.
--------------

19 वर्षानंतर किसनवीर कारखान्यावर सत्तांतर...
स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या ताब्यात असलेला किसनवीर साखर कारखाना 2003 साली मदन भोसले यांनी ताब्यात घेतला. त्यानंतर सलग 19 वर्षे त्यांनी कारखाना ताब्यात ठेवला होता. प्रचारात अनेक ठिकाणी आ. पाटील यांनी मनातली ही सल बोलून दाखवत मतदारांना भावनिक सादही घातली होती. त्याशिवाय सत्तारुढ पॅनेलचे मदन भोसले यांनी शेतकर्‍यांचे ऊसाचे पैसे व कामगारांचा कित्येक महिन्यांचा पगार न दिलेने परिवर्तन झाले.
------------
माजी आमदार व विद्यमान चेअरमन यांची होमपीचवरच पिछाडी...
विद्यमान चेअरमन मदन भोसले यांच्या होमपीचवरच त्यांना मोठा धक्का बसला असून भुईंज गटातून त्यांना केवळ 7081 मते मिळाली तर विरोधी उमेदवार प्रमोद शिंदे यांना 10458 मते मिळवुन 3377 मताधिक्य मिळाले. ऊस उत्पादक शेतकर्यांची नाराजी मताधिक्यात दिसून आली.

पाटील बंधूंची विजयाची घोड दौड सुरुच....
आ. मकरंद पाटील यांची आमदारकीची ही तिसरी टर्म असून त्यांना पडद्यामागुन सतत साथ करणारे नितिन पाटील पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या राजकारणात फ्रंटफूटवर आले. पाटील बंधूनी तिही निवडणूक जिंकत विजयश्री मिळवली. त्यानंतर खंडाळा साखर कारखान्याच्या निवडणुकीतही आ. पाटील यांची जादू दिसून आली.  तोच पायंडा कायम राखत पाटील बंधूंनी कारखानाही ताब्यात घेत विजयी घोडदौड सुरु ठेवली. याचा जिल्ह्याच्या राजकारणावर दुरगामी परिणाम होणार असून स्व. लक्ष्मणराव पाटील यांची जिल्ह्याच्या राजकारणावर असलेली पकड आगामी काळात या पाटील बंधूंकडेही दिसूनयेत आहे.
कारखाना निवडणुकीतील विजय 52 हजार शेतकरी सभासद व कामगारांचा आहे. गेली 17-18 वर्षे सत्तारुढ मंडळींनी चुकीच्या पध्दतीने कामकाज केले. प्रचंड भ्रष्टाचार केला. शेतकर्‍यांची देणी दिली नाहीत. उलट कारखान्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवला. कामगारांना वेळेवर वेतन दिले नाही. किसन वीर यांनी स्थापन केलेले आणि शेतकर्‍यांचे वैभव असलेले सहकार मंदिर रसातळाला नेले. परिणामी आज कारखान्यात सत्तांतर घडले. - आ. मकरंद पाटील
 इतर विरोधी उमेदवार प्रतिक्रीयेसाठी उपलब्ध होवू शकले नाहीत.
To Top