सोमेश्वरनगरच्या 'सुपुत्रा'ला कष्टाचं फळ ! 'एसटी'च्या पुणे जिल्हा विभाग नियंत्रकपदी रमाकांत गायकवाड यांची फेरनियुक्ती

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या  पुणे विभाग नियंत्रक पदी सोमेश्वरचे रमाकांत महादेव गायकवाड यांची निवड  करणेत आली आहे .
      राज्य परिवहन महामंडळात ३१ वर्ष ३ महिने नोकरी झाल्याने व वयाची ५८ वर्ष पुर्ण झाल्याने एक  महिन्यापुर्वी  गायकवाड सेवानिवृत्त झाले होते .मात्र त्यानी महामंडळात असताना राबविलेल्या विविध योजना तसेच विविध ठिकाणचा प्रदिर्घ अनुभव पाहता त्याना महामंडळातर्फे अधिकची सेवा करण्याची संधी मिळाली आहे . माझ्या अनुभवाचा जास्तीत जास्त फायदा सर्वसामान्य नागरिकाना व्हावा व महामंडळाचे ही उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने या पुढील काळात ही तेवढ्याच उत्साहाने काम करु असे रमाकांत गायकवाड यानी फेरनियुक्ती आदेश मिळाल्यानंतर " सोमेश्वर रिपोर्टर " शी बोलताना म्हणाले .
To Top