जेजुरी दि २
तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत पंढरपूर पुणे मार्गावर जुन्या नगरपालिके जवळ टायगर ग्रुपच्या वतीने भाविक,नागरिक व प्रवाश्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई सुरु करण्यात आली आहे. जेजुरीत पुणे पंढरपूर मार्गावर पीएमटी बस थांबा आहे.तसेच मोठ्या संख्यने भाविक व नागरिकांची यापरिसरात वर्दळ असते. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असून उष्णतेने नागरिकांची लाही लाही होत आहे. या परिसरात कोठे हि सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सोय नाही . हि अडचण लक्षात घेवून टायगर ग्रुप जेजुरी या संघटनेच्या युवकांनी जुन्या नगरपालिका परिसरात हि पाणपोई सुरु केली आहे.
टायगर ग्रुपचे विजयबापू राउत,सामाजिक कार्यकर्ते गौतम भालेराव ,दीपक भालेराव,शुभम जगताप,ओंकार पवार,नारायण जाधव,पिंटू कुदळे,दादा भालेराव,सारंग सोनवणे,विनोद सोनवणे,आकाश खंडागळे,अक्षय मोटे ,निखील पडळकर,सागर झगडे.,शेखर सोनवणेजमीर पानसरे,संदीप सोनवणे आदींनी हा उपक्रम राबविला आहे.