जेजुरी येथे शरदचंद्रजी पवारसाहेब क्रीडा संकुलात बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

Pune Reporter

जेजुरी  दि २
 जेजुरी औद्योगिक वसाहतीतील जेजुरी उद्योजक संघाच्या पद्मविभूषण शरदचंद्रजी पवारसाहेब क्रीडा संकुलात हभप दादासाहेब सोनवणे बॅडमिंटन हॉल मध्ये बाद पद्धतीच्या बडमिंटन स्पर्धा संपन्न झाल्या .या स्पर्धेत पुरंदर क्लबच्या तुषार शेंडकर व महेश कामठे यांनी प्रथम क्रमांक पटकविला.

     जेजुरी येथील औद्योगिक वसाहतीतील जेजुरी उद्योजक संघाच्या ( जीमा ) सभागृहावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या निधीतून बॅडमिंटन हॉल उभारण्यात आला आहे. या क्रीडा संकुलात पुरंदर क्लब व जेजुरी कडेपठार बॅडमिंटन क्लब यांच्यात तालुकास्तरीय बडमिंटनच्या बाद पद्धतीचे सामने खेळविण्यात आले. या स्पर्धेत ४० स्पर्धक सहभागी झाले होते. पुरंदर बडमिंटन क्लबच्या तुषार शेंडकर आणि महेश कामठे यांनी उत्कृष्ट खेळी करीत प्रथम क्रमांक पटकाविला तर संजय चव्हाण व नाना शिर्के यांनी द्वितीय क्रमांक पटकविला. तर कडेपठार बडमिंटन क्लबच्या डॉ. रामदास कुटे व युगा पवार आणि पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे व संभाजी जाधव यांनी चांगली खेळी केली. 

       विजयी स्पर्धकांचा जेजुरी उद्योजक संघाच्या वतीने यावेळी सन्मान करण्यात आला. जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ.रामदास कुटे,कार्याध्यक्ष रवींद्र जोशी,सचिव राजेश पाटील, व्यवस्थापक जालिंदर कुंभार क्रीडा संकुलाचे प्रमुख संभाजी जाधव,आशिष कदम आदींनी या स्पर्धेचे नियोजन केले होते.
      


To Top