सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम (ता. बारामती) येथील जगन्नाथ बाबुराव तांबे (वय ८९) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
पाडेगाव व राजुरी विविध कार्यकारी सोसायटीचे ते सचिव होते. तसेच निवृत्तीनंतर माळेगाव खुर्द पाणीपुरवठा संस्थेचे सचिव म्हणूनही त्यांनी १५ वर्ष काम पाहिले. मुरूमहुन माळेगावला निवृत्तीपर्यंत सायकल वर प्रवास करणारे व्यक्ती म्हणून त्यांची तालुक्यात ख्याती होती. तांबे कुटुंबाच्या बंधू, तिन्ही मुले आणि चारही नातवंडे अशा तीन पिढ्या त्यांनी उच्च शिक्षित केल्या. शारदानगरमधील शरदाबाई पवार विद्यानिकेतनचे वरिष्ठ लेखनिक विश्वास तांबे व वडगाव मधील स्वातंत्र्य विद्या मंदिरचे शिक्षक हेमंत तांबे, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका निर्मला घाटे यांचे ते वडील होत.