भोर : राजगडच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने लढणार

Pune Reporter
भोर प्रतिनिधी   
राष्ट्रवादीला साखर सहसंचालकांकडून दिलासा=बाद ठविलेले अर्ज वैध ठरले
     राजगड सहकारी साखर कारखान्याच्या 17 जागेच्या निवडणुकीत प्रादेशिक सहसंचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा दिला असून छाननी प्रक्रियेत अवैध ठरलेले 11 पैकी 9 अर्ज साखर प्रादेशिक सहसंचालकांनी वैध ठरविले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागांवर निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आसल्याने राष्ट्रवादी निवडणूक जोमाने लढण्याचे चित्र आहे.                                              निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या 11 उमेदवारांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद केले आहे तशी तक्रार करत त्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने साखर प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे अपील केले होते. त्यावर सहसंचालकांनी मंगळवार दि. 17  निर्णय दिला असून 120 पैकी 9 अर्ज वैध ठरविले आहेत तर 2 अर्ज नामंजूर झाल्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान बुधवार दि. 18 उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख असल्याने दुपारी 3 नंतर निवडणूक होणार की दोन्ही पक्षात समझोता होऊन कारखाना बिनविरोध होणार नाही चित्र स्पष्ट होणार आहे.
                                          
To Top