सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुर्टी येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये वाणेवाडी ता बारामती येथील गोटू जगताप व सांगवी-कांबळेश्वर येथील चॉकलेट फॅन्स क्लब यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला.
या शर्यतीसाठी सातारा, पुणे, शिरूर, अकलूज, सोलापूर, इंदापूर, दौंड, मुंबई येथील जवळपास १२५ बैलगाडीने सहभाग नोंदवला होता. या मैदानात ७ फाट्या होता. यामध्ये २५ गट पळवण्यात आले. तर पाच सेमिफायनल पळवण्यात आल्या. अंतिम फेरीसाठी सात बैलगाड्या पळवण्यात आल्या. यामध्ये वाणेवाडी व कंबळेश्वर येथील किरण (गोटू) जगताप व चॉकलेट फॅन्स क्लब च्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय कुसुर ता फलटण येथील अनुश्री शिंदे, तृतिय कोऱ्हाळे येथील रुद्रासागर धापटे, चतुर्थ मुरूम किरण शिंदे, पाचवा मुरटी येथील साईराज खोमणे सहावा मुरटी येथील मयुर शिंदे तर सातवा किरण जगदाळे यांच्या बैलजोडीने मैदान गाजविले.
शर्यती पार पाडण्यासाठी मुरटी येथील भैरवनाथ यात्रा कमिटीने सहकार्य केले.