सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे पुणे-सातारा महामार्गावरील वेळू ता .भोर प्रशासनाच्या वतीने स्वागत करीत ऐतिहासिक फोटोची दिनदर्शिका भेट देण्यात आली.
पुणे-सातारा महामार्गावरून भोरच्या ऐतिहासिक भूमीतून महाबळेश्वरच्या दिशेने राज्यपाल भगतसिंग कोशारी जाताना वेळु ता.भोर येथे थांबले असताना भोर प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी राजेंद्र कचरे ,तहसीलदार सचिन पाटील तसेच प्रशासनाचे सर्व अधिकारी यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन तालुक्यातील फोटोंची दिनदर्शिका भेट देऊन स्वागत केले .यावेळी कोशारी यांनी भोर तालुक्यातील राज्यभर प्रसिद्ध असलेली पर्यटन स्थळे याची आवर्जून माहिती घेतली.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,उपअधीक्षक धनंजय पाटील भोर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, राजगड पोलीस निरीक्षक सचिन पाटील उपस्थित होते.