सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील मंगळवार पेठ येथे बाजारवाडी ता.भोर येथील सद्या वास्तव्यास असणाऱ्या अंकुश मारुती शिंदे यांच्या दुसऱ्या पत्नीच्या (सावत्र आईच्या) डोक्यात बुधवार दि.२९ पहाटेच्या वेळी पहिल्या बायकोच्या मुलाने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. आरोपी माउली अंकुश शिंदे वय -२४ फरार असून भोर पोलिस त्याचा शोध घेत आहे.
आरोपी याने वडील रात्रपाळीला कामावर गेल्याची संधी साधत पहाटे सावत्र आई रेश्मा अंकुश शिंदे बुधवारी पहाटे झोपेत असताना भला मोठा दगड त्यांच्या डोक्यात घालून खून केला. काही वेळातच आरोपी पळून गेला असून पोलिस पथक त्याच्या शोधावर रवाना झाले आहे.