वाई बिग ब्रेकिंग ! वेलंग मधील ऊंबरवाडीत तरुणावर सत्तुराने वार : तिघांना अटक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
वाई तालुक्यातील वेलंग मधील ऊंबरवाडीतील
एका २६ वर्षीय तरुणावर लगतच असलेल्या चिकनच्या दुकानातुन सत्तुर आणुन डोक्यात आणी पाठीवर सपासप वार करून कोसळल्यावर देखील लाथा बुक्यांनी मारहाण करुन तिघेही पळून गेल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली. 
          याची माहिती सपोनि रविंद्र तेलतुमडे यांनी लोणंद पालखी बंदोबस्तात असलेले  पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना या गंभीर घटनेची माहिती दिली त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पळून गेलेल्या तिनही आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. गुन्हेगार पकडण्यासाठी सपोनि रविंद्र तेलतुमडे यांनी आपले सहकारी पिएसआय वाळुंज दप्तरी अजीत जाधव डिबी पथकातील किरण निंबाळकर यांना सोबत घेऊन तातडीने घटना स्थळाला भेट दिली तेथील पाहणी केल्या नंतर  पळून गेलेल्या तीन आरोपींना पकडण्या साठी  ऊंबरवाडी सह परिसरात अनेक ठिकाणी धाडी 
टाकून सत्तुरने वार करणारा व मुख्य आरोपी असलेला राहुल भानुदास जाधव वय २९ याला पकडण्यास यश आले पण आरोपीचे वडील भानुदास बंडू जाधव आणी आई निर्मला भानुदास जाधव हे दोघे पळून जाण्यास यशस्वी झाले .मुख्य आरोपी राहुल जाधव यास वाई पोलिस ठाण्यात आणुन त्याच्या सह त्याच्या आई वडिलांन वर कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यास वाईच्या न्यायालया समोर ऊभे केले असता न्यायालयाने त्यास दि.३० पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
        सपोनि रविंद्र तेलतुमडे व त्यांचे सहकारी पळून गेलेल्या दोन आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
सपोनि रविंद्र तेलतुमडे यांनी दिलेली माहिती अशी की वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील  वेलंग येथील ऊंबरवाडी येथील भैरोबाच्या मंदिरा शेजारी तक्रारदार अभिजीत कृष्णदेव जाधव वय २९ हे आपल्या मालकीचे असलेल्या 
पत्र्याच्या शेड मध्ये सरी काढण्याची पलटी ट्रॅक्टर मधुन सोडुन ठेवत असताना त्या ठिकाणी मुख्य आरोपी असलेला राहुल भानुदास जाधव हा आला व तो म्हणाला की आमच्या हद्दीत ट्रॅक्टर व औजारे सोडुन ठेवायची नाहीत हे पत्र्याचे शेड आमच्या मालकीचे आहे  असा दम तक्रारदार अभिजीत  यास दिला त्या मुळे शेडच्या हद्दी व मालकी  वरुन आरोपी आणी तक्रारदार यांच्या मध्ये बाचाबाची झाली त्याचा राग मनात धरून लगतच आरोपी राहुल याचे  स्वताच्या मालकीचे असलेल्या चिकन शॉप मधुन सत्तुर 
आणला व सत्तुर नाचवत तक्रारदार अभिजीतला म्हणाला कि मी आता तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणुन अभिजीतला ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात आणी पाठीवर सपासप वार केल्याने अभिजीत गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळला तरी देखील आरोपीचे वडील भानुदास बंडू जाधव आणी आई निर्मला भानुदास जाधव यांनी घटना स्थळावर येऊन जखमी अभिजीतला लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली .व पोलिस येतील या  भिती मुळे हे तिनही आरोपी तेथुन पळून गेले .
          जखमी अभिजीतला वाई येथे ऊपचारा साठी 
खाजगी रुग्णालयात दाखल केले होते पण तेथे 
आवश्यक ऊपचारांची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यास सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती सपोनि रविंद्र तेलतुमडे यांनी सोमेश्वर रिपोर्टर प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे .
To Top