सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
भोरच्या पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यात एसटीच्या तुटपुंज्या फेऱ्यांमुळे नागरिक व विद्यार्थी त्रस्त झाले होते. एसटी बसच्या फेऱ्या वाढवा याचे लेखी निवेदन भोर आगार प्रमुखांना दि. २४ सामाजिक कार्यकर्ते मनोज धुमाळ आणि उद्योजक राजेश सणस यांनी समक्ष भेटून दिले होते.याचे वृत्त सोमेश्वर रिपोर्टर मध्ये छापून आले होते याची दखल घेत बहुर आगाराकडून भोर-पसुरे मार्गावर एसटीच्या फेऱ्या वाढविल्या असून पसुरे येथे एसटीचे हार व श्रीफळ वाढवून स्वागत केले व चालक - वाहकांचा सत्कार करण्यात आला...
या प्रसंगी ग्रा.पं.सदस्य सुरेश धुमाळ,मा.उपसरपंच राजेंद्र धुमाळ, उद्योगपती राजेश सणस,ज्ञानोबा धानवले,भगवान धुमाळ,तुकाराम धानवले,मारुती धुमाळ, योगेश खोपडे,तानाजी धुमाळ आदी ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.सदरील एसटी बस पसुरे ते पंढरपूर अशी असल्याने विद्यार्थी वर्गासह नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आगार व्यवस्थापक श्री. युवराज कदम यांनी तात्काळ दखल घेऊन बस सुरू केलेने वाहतुकीचा मोठा प्रश्न मिटला आहे.