सुरेशआण्णा कुलथे यांची ४५ वी वारी राहीली अधुरी : वारी दरम्यान निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 सलग गेली ४४  वर्ष ज्ञानोबा माऊलीच्या अधिकृत दिंडीत पायी  वारी करणारे  जामखेड ता. अहमदनगर चे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल भक्त सुरेश माधवराव कुलथे यांचे वारी दरम्यान निधन झाले .
     वय वर्ष ६५ असलेले  सुरेश कुलथे वयाच्या २१ वर्षापासून आळंदी ते पंढरपूर न चुकता  वारी करीत आहेत .नेहमीप्रमाणे यंदा ही आळंदीतुन ते निघाले शनिवार ता २५ जुन रोजी ज्ञानोबा पालखी सोहळ्यासमवेत ते सासवड मुक्कामी आले रात्री दोन वाजता डोकेदुखीचा त्रास झाला. डॉ खळदकर यानी प्राथमिक उपचार केले त्यानंतर त्याना पुण्यातील नोबेल रुग्णालयात नेणेत आले . अचानक मेंदूविकार उद्भवल्याने दोन दिवसाची मृत्युशी असलेली झुंझ आज अयशस्वी ठरली व त्यांचे मंगळवार दुपारी निधन झाले वारी करणाऱ्या भक्ताना वृद्ध पुरुष व महिलाना त्यांचा मोठा आधार होता .अनेक जण आपल्या आई वडीलाना त्यांचे आधारावर वारी ला पाठवत असत जामखेड परिसरात निरनिराळ्या सामाजिक उपक्रमात त्यांचे योगदान मोठे होते .
त्यांचेमागे पत्नी ,दोन मुले ,एक मुलगी व भाऊ ,बहिणी असा परिवार आहे .
To Top