सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील पाहिले अश्व रिंगण पार पडले. लाखो समुदयाच्या उपस्थितील डोळ्यांचे पारणे फेडणारे रिंगण पार पडले.
सकाळी निंबुत येथील मुक्काम उरकून सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी निंबुत छपरी येथे विसावला. याठिकाणी सोमेश्वर कारखान्याने माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, संचालक लक्ष्मण गोफणे, उपसरपंच अमर काकडे यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सकाळची न्याहारी देण्यात आली. त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी पालखी सोहळा वाघळवाडी येथे विसावला.
यंदा प्रथमच पालखी अंबामाता मंदिर या ठिकाणी विसाव्यासाठी ठेवण्यात आली. ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत गावकऱ्यांनी आनंदाच्या वातावरणात रस्त्याच्या दुतर्फा संपूर्ण रांगोळी काढून निरा बारामती रस्त्यावर स्वागत कमानी उभारून व पुष्पवृष्टी करून स्वागत केले. त्यानंतर संत सोपान का महाराज सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी यांचा ग्रामपंचायत वाघळवाडी च्या वतीने सरपंच नंदा सकुंडे यांनी सत्कार केला. उपस्थित उपसरपंच जितेंद्र सकुंडे, सदस्य पांडुरंग भोसले, हेमंत गायकवाड, माजी सरपंच सतीश सकुंडे, सुचिता साळवे, तुषार सकुंडे, प्रदीप मांगडे, ग्राम विकास अधिकारी नरसिंग राठोड सर्व ग्रामस्थ उपस्थित होते वारकर्यांनी न्याहरी बरोबर, झुणका भाकर आस्वाद घेतला व त्यानंतर आराम करून दोन वाजता पालखीने रिंगणासाठी मु. सा काकडे महाविद्यालयाच्या दिशेने प्रस्थान केले.
याठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी तहसिलदार विजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वरचे संचालक संग्राम सोरटे, ऋषी गायकवाड, अनंत तांबे, किसन तांबे, काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे, उपप्राचार्य डॉ जगन्नाथ साळवे, प्रा, संजू जाधव, प्रा, रवींद्र जगताप, पंचायत समिती सदस्य मेनका मगर, सतीश सकुंडे, सुचेता साळवे, देविदास निकम, दीपक निंबाळकर, नितीन कुलकर्णी, किशोर भोसले, रुपचंद शेंडकर, शामराव धुमाळ, मंडल अधिकारी प्रमिला लोखंडे, तुषार सकुंडे, प्रदीप मांगडे, हेमंत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
काकडे महाविद्यालयात रिंगण सोहळ्यासाठी सोहळा विसवल्यानंतर प्रथम सोपानकाकांच्या पादुकांची गोल रिंगण पूर्ण केले. त्यानंतर अंजनगाव येथील परकाळे यांच्या मानाच्या आश्वाने दोन वेळा गोल रिंगण पूर्ण करत उपस्थित्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यानंतर झेंडेवाले, विणकर तसेच वृंदावन डोक्यावर घेऊन महिला वारकऱ्यांनी विठूनामाचा गजर पूर्ण करत गोल रिंगण पूर्ण केले.
वडगाव निंबाळकर सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख वाहतूक व्यवस्था व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांची आरोग्याची काळजी घेण्यात आली होती. साई सेवा हॉस्पिटलच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य शिबीर ठेवण्यात आले होते. महसूल विभाग, सोमेश्वर कारखाना प्रशासन, सोमेश्वर महावितरण यांनी पालखी सोहळ्याला सहकार्य केले. सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळा मुक्कामासाठी सोमेश्वर कारखान्याच्या शिवाजी प्रांगणात विसावला. कारखान्याच्या वतीने वारकऱ्यांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली होती.
----------------------
यावर्षी पालखी सोहळ्याबरोबर चार दिंड्या वाढल्या असून दीड लाखांच्या आसपास वारकरी बांधव आहेत. येथून मागे सोपानकाका सोहळ्याला शासनाचे दुर्लक्ष होते मात्र यावर्षी आम्हाला चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळू लागल्या आहेत. यावर्षी शौचालय मिळाली असून यामध्ये पुढील वर्षी वाढ होणे अपेक्षित आहे.
त्रिगुण महाराज गोसावी
सोहळा प्रमुख