सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आज साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे वारकरी बांधवांसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निरा येथे व संत सोपान काका महाराज पालखी सोहळा सोमेश्वरनगर येथे भव्य मोफत शिबिर भरविण्यात आले. यामध्ये मोफत औषधे वाटप व अल्पोपहार वाटप करण्यात आले. सदर शिबिरामध्ये सोमेश्वर व नीरा येथे एक हजार पेक्षा जास्त वारकरी बांधवांना शिबिराचा लाभ घेतला ,या शिबिरामध्ये हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. विद्यानंद भिलारे डॉ.राहूल शिंगटे, डॉ शुभम शहा, डॉ. रमेश पोकळे ,डॉ. चैतन्य झेंडे, डॉ.जयश्री भिलारे, डॉ. नीता शिंगटे, डॉ. रझिया मुलानी आणि हॉस्पिटल स्टाफ यांचे योगदान मिळाले,
तसेच शिबिरामध्ये राजाभाऊ भिलारे (वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य) यांचे औषध वाटपासाठी लाख मोलाचे सहकार्य लाभले.