सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथील ग्रामस्थांनी संत सोपानकाका पालखी सोहळ्याला दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
संत सोपानकाका पालखी सोहळ्याने काल दि. २७ रोजी पुरंदर तालुक्याची हद्द सोडत बारामती तालुक्यात प्रवेश केला. निंबुत ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी यांचेकडे निंबूतकरांनी दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिश काकडे, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर काकडे, सरपंच निर्मला काळे, उपसरपंच अमरसिंह काकडे, कुमावती काकडे, सुजित काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.