सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पिसर्वे : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथे काल रात्री लागलेल्या आगीत श्रद्धा जनरल स्टोअर्स हे दुकान जळून खाक झाले. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किट ने ही आग लागल्याचे बोलले जात आहे.
मनोज शेंडकर यांचे मालकीचे हे दुकान होते. या आगीत दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. जेजुरी व सासवड नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाने ही आग विझवण्यात आली.