बारामती ! सोरटेवाडी माध्यमिक विद्यालय येथे योग शिबीराचे आयोजन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
बारामती ! प्रतिनिधी
नेहरू युवा केंद्र पुणे आज बारामती तालुक्यात सोरटेवाडी माध्यमिक विद्यालय करंजे सोरटेवाडी  विविध ठिकाणी योग शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. 
संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साधना शिबीर योगा महाविद्यालयात घेण्यात आला़• योगा शिक्षक नरेश केसकर यांनी निरोगी , तंदूरुस्त व तणावमुक्त राहण्यासाठी योगा महत्वाचा असे सांगून योगाचे महत्व पटवून दिले व उपस्थितांना योग साधनेचे धडे दिले• हा कार्यक्रम माध्यमिक विद्यालय करंजे सोरटेवाडी व नेहरू युवा केंद्र पुणे उपसंचालक यशंवत मानखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला• 
योग साधनेमुळे मन आणि शरीर कणखर बनते• त्यामुळे उत्सव वाढून काम करण्याची नवीन ऊर्जा मिळते,असे मत  युवराज नेवसे सर 
यांनी व्यक्त केले• नेहरू युवा केंद्राचे बारामती तालुका प्रतिनिधी  धिरज वायाळ तसेच प्राचार्य लकडे  सर, व भोसले सर इतर शिक्षक उपस्थित होते
To Top