सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी जपत तसेच माजी विद्यार्थी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेघर ता. भोर येथील शाळेतील ६५ विद्यार्थ्यांना सिद्धेश्वर ग्राम विकास मंडळ मुंबई (आंबेघर) तसेच सह्योग संस्था पुणे यांच्याकडून २५ हजार रुपयांचे शालेय साहित्य मोफत वाटप करण्यात आले .
यामध्ये मुलांना वर्षभर पुरतील एवढ्या वह्या व इतर लेखन साहित्य तसेच काही विद्यार्थ्यांचे पालक कोरोना काळात दिवंगत झाले त्यांच्या पाल्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.यावेळी मुंबई मंडळाचे सर्व आजी, माजी पदाधिकारी, ग्रामस्थ महिला पालक, मुख्याध्यापिका श्रीमती मीना रणनवरे,सुरेश पिसाळ,प्रदीप मोझर,वसंत कंक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयश्री खोपडे उपस्थित होते.सूत्रसंचालन मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष मारुती खोपडे यांनी केले.