सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी भोर तालुक्याचा अतीदुर्गम भाग असलेल्या पश्चिमेकडील वेळवंड ता.भोर खोऱ्यातील विद्यार्थी-विद्यार्थीनीना भोरला शिक्षणासाठी तर नागरिकांना आपली शासकीय काम व बाजारला येण्यासाठी खासगी गाड्यांचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.तर वाहनांची तासंतास वाट पाहत उभे राहावे लागत असल्याने एस.टी.बसच्या फेऱ्या वाढवा अशी अर्त हाक नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी यांनी आगार प्रमुख युवराज कदम यांना निवेदन देत केली आहे. वेळवंड खोरे परिसरात एसटी बसच्या फेऱ्या वाढल्या तर ग्रामीण भागातील जनतेची व शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही तसेच या भागातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.यावेळी निवेदनाचा विचार करून एस.टी. बसच्या फेऱ्या वाढवण्याबाबत आगार प्रमुखांनी सकारात्मक भूमिका दाखविली. यावेळी सोपान यादव,चंद्रकांत भेलके हे अधिकारी तसेच आम्ही बोरकर संस्थेचे सचिव विनय पलंगे,सामाजिक कार्यकर्ते मनोज धुमाळ,किरण खोपडे,भीमा गायकवाड उपस्थित होते