सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी'चे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप हे होते.
यावेळी हनुमान मंदिर चौक सुशोभिकरणं ,दत्तवाडी येथे सिमेंट रस्ता तसेच समशानभूमी मधील रस्ता करणे या कामांचा भूमीपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंच स्मिता काकडे, उपसरपंच संजय जगताप,सदस्य तसेच किशोर भोसले, विक्रम भोसले, राजेंद्र जगताप, सुनील भोसले, डॉ. रविंद्र सावंत,पोपटतात्या भोसले, ठेकेदार विजयेद्र शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी बोलताना संभाजी होळकर म्हणाले की, नवीन ग्रामपंचायत कार्यालयास निधी उपलब्ध करून दिला असून शुद्ध पाणी फिल्टर योजना, अभ्यासिका तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागणी केलेली अनेक विकासकांमाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे.दर्जेदार कामे व्हावीत आणि निधीची कमतरता भासु देणार नसल्याचे मत यावेळी मांडले. सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, अजितदादा यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागली असून वाणेवाडी प्रगतीपधावर राहिले आहे. कामे दर्जेदार व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. असे मत मांडले.
कार्यक्रमावेळी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे स्वागत राजेंद्र जगताप यांनी केले.तर उपस्थिताचे आभार ग्रामविकास अधिकारी पी के गाढवे यांनी मानले.