सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील चोपडज येथे सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचे सर्व निर्माते व कलाकार टिमचे चोपडज ग्रामस्थांच्या वतीने फटाके, वाद्य वाजवत जोरदार स्वागत केले,
या चित्रपटाचे निर्माते संदिपदादा मोहिते पाटील व सुर्याजीच् मालुसरे या भुमिकेत प्रतीक मोहिते पाटील, भिकाजी वरखडे यांच्या भुमिकेत प्रशांत मोहिते पाटील, एका मावळ्याच्या भुमिकेत डॉ. रंजित निकम ,मयूर कुपाडे, श्रीहरी काळे,सुरज भिसे, योगेश जगदाळे, गणेश फणसे, ओंकार गायकवाड या सर्व कलाकार यांचे फेटा बांधून,मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा.बाळासाहेब जगताप सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले,सुत्रसंचालन देविदास जगताप यांनी केले,
निर्माते संदिपदादा मोहिते पाटील म्हणाले की आपल्या कुटुंबातील माणसांनी केलेला सत्कार यापेक्षा कोणताही सत्कार मोठा नाही. त्यांनी खुपच आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी चोपडजचे समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.सर्वांचे आभार ग्रा.पंचायत सदस्य सागर गाडेकर यांनी मानले . ताई फाउंडेशनच्या वतीने लहान-थोरांसाठी सरसेनापती हंबीरराव चित्रपट पहाण्यासाठी नवनाथ थिएटर( वाणेवाडी)150 तिकीटांचे बुकिंग करून जाण्यायेण्याची सोय करण्यात आली.