सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या पसरणी गावातील एक ३२ वर्षीय मनोज हणमंत फरांदे हा तरुण सतत आपल्या जवळ ९ रांऊडचे असणारे रिवाल्वर ( गावठी कट्टा ) बाळगत असल्याची माहिती ग्रामस्थांनी
वाई पोलिसांना दिली.
पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना दिली भरणे यांनी काही अनुचित दुर्घटना घडु नये म्हणून घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ डिबी पथकाचे सहाय्यक फौजदार विजय शिर्के महिला पोलिस नाईक सोनाली माने कॉस्टेबल किरण निंबाळकर श्रावण राठोड अमीत गोळे प्रसाद दुदुस्कर आणी पसरणी बीटचे बीट अंमलदार श्रीनिवास बिराजदार यांना घटना स्थळावर पाठवुन मनोज फरांदे याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते त्या मुळे पाठवलेल्या पोलिस पथकाने रिवाल्वर सह आरोपी मनोज फरांदे याला ताब्यात घेण्यात आले आहे.
बाळासाहेब भरणे यांनी दिलेली माहिती अशी की पसरणी ता.वाई गावात राहणारा मनोज हणमंत फरांदे वय ३२ हा पुर्वी कामासाठी मुंबईला राहत होता तेथुन त्याला मुंबई पोलिसांनी तडीपार केल्या नंतर तो मध्य प्रदेश मधील ऊज्जेन येथे राहण्यासाठी गेला होता तेथुन तो ३ वर्षा पुर्वी पसरणी या मुळ गावी परत आला त्या वेळी त्याने सोबत ९ रांऊडचे असणारे रिवाल्वर ( गावठी कट्टा ) सोबत आणला होता असे त्याने कसून केलेल्या तपासात सांगितले आहे .पुढे अधीक तपास केला असता त्याचे पसरणी गावातील काही लोकांन सोबत जमीनींची भांडणे आहेत त्यांच्या कडून सतत त्रास होत असल्याने त्यांचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्याने विना परवाना हे रिवाल्वर स्वताच्या घरात आणुन ठेवले होते .
काल दिनांक १ जुन रोजी मनोज फरांदे हा घरातुन बाहेर पडताना त्याच्या खिशात रिवाल्वर असल्याचे पसरणी गावातील काही ग्रामस्थांनी पाहीले त्याची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना दिली काही अनुचित दुर्घटना घडु नये म्हणून डिबी पथका सह बीट अंमलदार यांना पाठवुन त्याच्या जवळचे विना परवाना असणारे रिवाल्वर जप्त करुन त्याला वाई पोलिस ठाण्यात आणुन त्याच्या वर विना परवाना रिवाल्वर बाळगल्याने गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे . मनोज फरांदे याने पसरणी गावात घातपात
करण्याच्या ऊद्येशाने हे रिवाल्वर स्वताच्या जवळ बाळगले होते हेही तपासात उघडकीस आले आहे .पण पसरणी गावातील ग्रामस्थांच्या मदतीने हा गंभीर गुन्हा उघडकीस आल्याने भरणे यांनी समाधान व्यक्त करुन ग्रामस्थांचे आभार मानले आहेत .