सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
गेल्या चार महिन्यात दुसऱ्यांदा कवठे ता.वाई गावात अज्ञात चोरट्यांच्या टोळीने घरात माणसं असताना देखील दोन घरांच्या आतुन लावलेल्या कड्या काढून घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील कपडे बाहेर काढुन तब्बल १० तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याने कवठे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . चोरट्यांच्या या धाडीमुळे खळबळ उडाली आहे .
याची माहिती सातारा एलसीबीचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना समजताच त्यांनी या चोरीची आणी चोरांची तातडीने माहिती घेण्यासाठी एलसीबीचे भुईंज बीट अंमलदार सचिन ससाणे वैभव सावंत मोहन पवार यांचे पोलिस पथक तयार करुन तातडीने कवठे गावात पाठविले होते या पथकाने आवश्यक असणारी माहिती संकलित करुन मार्गदर्शन मिळण्या साठी आणी येथील घरफोड्या तातडीने उघडकीस आणण्या साठी त्याचा अहवाल तयार करुन तो पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या कडे सादर केला आहे .
एलसीबीच्या पथकाने दिलेली माहिती अशी की कवठे गावात मंगळवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांच्या टोळीने प्रथम मर्ढेकर माळावर असणारे घर फोडण्याचा प्रयत्न करत असताना घरातील लोक जागे झाल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कवठे गावाकडे वळवला तेथील रामचंद्र दादु कुडाळकर यांच्या घराला आतुन कडी असताना देखील ती उघडुन आत प्रवेश करुन लोखंडी कपाट उघडुन त्यातील १० तोळे सोन्याचे दागिने हाती लागताच तेथुन त्यांनी पळ काढला आणी संभाजी यदू ससाणे यांचे घर फोडले त्या ठिकाणी पर्समध्ये ठेवलेली अर्ध्या तोळा वजनाची सोन्याची अंकठी आणी रोख रक्कम घेऊन चोरटे बाहेर पडले आणी रामचंद्र डेरे यांचे घर फोडत असताना घरातील लोक जागे झाल्याचे पाहुन चोरटे हादरले आणी त्यांनी पळ काढला नंतर गाव जागे झाले तो पर्यंत चोरांच्या टोळीने बरेच अंतर कापले होते.
गेल्या चार महिन्यात चोरट्यांनी हि दुसर्यांदा घरे फोडून चोरी केल्याने कवठे गावचे नागरीक सध्या चोरांच्या दहशती खाली वावरत आहेत .येथील झालेल्या घरफोड्या या उघडकीस आणण्यास एलसीबीला नक्कीच यश येईल असा विश्वास पथकातील पोलिसांनी व्यक्त केला आहे.पण कवठे गावातील नागरिकांनी येथे सतत होणार्या घरफोड्यांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे .