सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
तु आमच्या पाहुण्याच्या दुकानात का बसला, तसेच वडीलांना मारलेच्या कारणावरुन लक्ष्मीबाई यांचा मुलगा तुषार चांदगुडे व पुतण्या मुलगा शेखर यास लाकडी दांड्याने मारहाण करीत असताना दत्तात्रय चांदगुडे हे शेखर याला सोढविण्यासाठी गेले असता अमोल मारुती चांदगुडे,गणेश मारुती चांदगुडे, सुमन मारुती चांदगुडे यांनी फिर्यादीचा पुतण्या दत्तात्रय चांदगुडे याला जिवे मारण्याचे उद्देशाने डोक्यात, तोंडावर व पाठीत लोखंडी पाईप ,लाकडी काठी व दगडाने मारहाण केली तसेच लक्ष्मीबाई चांदगुडे यांना सुमन चांदगुडे व अमोल चांदगुडे यांनी दगडाने व लाकडी काठीने डोक्यात व हातावर मारहाण करत शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबद्दल वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लक्ष्मीबाई विठ्ठ्ल चांदगुडे वय 45 वर्षे धंदा शेती रा.खोपवाडी ता बारामती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
तुषार दिलीप चांदगुडे, अमोल मारुती चांदगुडे, सुमन मारुती चांदगुडे, गणेश मारुती चांदगुडे, अक्षय दिलीप चांदगुडे सर्व रा. खोपवाडी ता बारामती जि.पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुपे येथे अनिकेत चव्हाण याचे दुकानात फिर्यादीचा मुलगा शेखर चांदगुडे यांस अक्षय दिलीप चांदगुडे व तुषार दिलीप चांदगुडे यांनी तु आमचे पाहुण्याचे दुकानात का बसला ,2 वर्षापुर्वी तु माझे वडीलांना मारले या कारणावरुन लोखंडी गजाने मारहाण केली तसेच दिनांक 28/06/2022 रोजी सकाळी 08:00 वाचे सुमारास फिर्यादीचे घरासमोर वडीलांना मारलेचे कारणावरुन तुषार चांदगुडे हा फि चा मुलगा शेखर यास लाकडी दांड्याने मारहाण करीत असताना फि व फि चा पुतण्या दत्तात्रय चांदगुडे हे शेखर याला सोढविण्यासाठी गेले असता अमोल मारुती चांदगुडे,गणेश मारुती चांदगुडे, सुमन मारुती चांदगुडे यांनी फिर्यादीचा पुतण्या दत्तात्रय चांदगुडे याला जिवे मारण्याचे उद्देशाने डोक्यात ,तोंडावर व पाठीत लोखंडी पाईप ,लाकडी काठी व दगडाने मारहाण केली तसेच लक्ष्मीबाई चांदगुडे यांना सुमन चांदगुडे व अमोल चांदगुडे यांनी दगडाने व लाकडी काठीने डोक्यात व हातावर मारहाण केली तसेच सर्वांनी आम्हाला शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन फिर्यादी यांची तुषार दिलीप चांदगुडे, अमोल मारुती चांदगुडे, सुमन मारुती चांदगुडे, गणेश मारुती चांदगुडे, सर्व रा.खोपवाडी ता बारामती जि.पुणे यांचे विरुद्ध तकार आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीकारी गणेश इंगळे यांनी भेट दिली. पुढील तपास सपोनि सोमनाथ लांडे करत आहेत.