समाज हितासाठी ! ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशन व ज्युबिलंट इंग्रेव्हिआ लि.तर्फे परिसरातील नागरिकांसाठी फिरता दवाखाना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशन व ज्युबिलंट इंग्रेव्हिआ लि.तर्फे नीरा निंबुत,पाडेगाव व जवळपासच्या पंचक्रोशीतील गावांकरिता टेलिमेडिसीन सेवा सुरू करणेसाठी अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधा सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अ‍ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून फिरता दवाखाना असणार आहे.या अ‍ॅम्ब्युलन्स द्वारे रोज एक डॉक्टर व एक पारिचारिका गावांमध्ये जाऊन सर्वांना प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविणार आहेत. ज्या गावांमध्ये दवाखाना किंवा आरोग्य सुविधा नाहीत अशा 10 गावांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. या फिरत्या दवाखान्या मार्फत, प्राथमिक आरोग्य सुविधा, विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून गावातील प्रत्येकापर्यंत आरोग्य सुविधा पोहचविणे हा यामागचा उद्देश आहे.ही सुविधा पूर्णपणे मोफत असून तपासणीदरम्यान आवश्यक औषधे देखील विनामूल्य दिली जाणार आहेत.
       याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला कोल्हापूरचे पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया,अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विजय वाघ,तालुका आरोग्य अधिकारी विक्रम काळे व श्री. तिडके याबरोबरच ज्युबिलंट इंग्रेव्हिआ लि.चे उपाध्यक्ष सतीश भट,प्रॉडक्शन हेड सुब्रह्मण्यम भट,एचआर हेड दीपक सोनटक्के, इंजिनिअरींग हेड राजेंद्र राघव, ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशनचे सीएसआर प्रमुख अजय ढगे,अ‍ॅडमिन व सिक्युरिटी हेड सत्येंद्र कुमार,सिक्युरिटी मॅनेजर युवराज व  इतर विभागप्रमुख उपस्थित होते, अशी माहिती ज्युबिलंट इंग्रेव्हिआ लि.चे जनसंपर्क व्यवस्थापक इसाक मुजावर यांनी दिली.
To Top