भोर ! वरंधा घाटात दरड कोसळली : हॉटेल व्यवसायिक जखमी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
 गेल्या दोन वर्षापासून वरंधा (वाघजाई) घाटात दरड कोसळण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. बुधवारी दि.२९ दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान उंबर्डे ता.भोर गावच्या हद्दीत वरंधा घाटातील वाघजाई मंदिराशेजारी एका पत्राशेडच्या हॉटेलवर दरड कोसळली.यावेळी हॉटेलमध्ये असणारे हॉटेल व्यवसायिक अरुण गणपत उंब्राटकर (पवार) वय- ५५, राहणार वरंध ता.महाड हे गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय महाड येथे दाखल करण्यात आले.
      या घटनेची खबर लागताच भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील तसेच  महाडच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली.घाटात दरड कोसळली काही वेळातच रस्त्यावरील दगडी बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे असे शाखा अभियंता सदानंद हल्लाळे यांनी सांगितले.
To Top