सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भाटघर धरणावरील वीज निर्मिती केंद्रातील पाइप व व्हॉल्वची त्रैवार्षिक दुरुस्ती व देखभाल करण्यात येणार असल्यामुळे ६ जून ते १० जून या चार दिवसांच्या कालावधीमध्ये शहराचा पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा बंद राहणार आसल्याची माहिती शाखाधिकारी भाटघर पाटबंधारे शाखा यांनी दिली.
भाटघर वीजनिर्मिती केंदरातील पाईप व व्हालवची त्रैवार्षिक दुरुस्ती केली जाते त्याप्रमाणे यंदाही दुरूस्ती करण्यात येणार आहे.शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने ६ जून पूर्वी पाणीसाठा करून ठेवावा.असेही आवाहन संबंधित विभागाला करण्यात आले आहे.ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
--------------------------
दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करू
भाटघर धरण वीज निर्मिती केंद्रातील पाईप व हॉलवची दुरुस्ती व देखभाल करण्याचे काम करण्यासाठी चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असला तरी भोर शहरासाठी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येईल असे मुख्य अधिकारी हेमंत किरुळकर यांनी सांगितले.