भोर बिग ब्रेकिंग ! पैसे देवाणघेवानीतून दोघांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील बस स्टॅन्ड नजीक असणाऱ्या स्मशानभूमी जवळील पत्रा शेडमध्ये पैशांच्या देवान-घेवानितून झालेल्या भांडणात जोरदार हाणामारी होऊन अक्षय कन्हैया गायकवाड वय -३२ रा. भोर एसटी स्टँड हा गंभीर जखमी झाला.
         त्या जखमीस त्याच्याच भावाने (विजय कन्हैया गायकवाड) उपचारासाठी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता काही वेळाने उपचारादरम्यान अक्षय याचा मृत्यू झाला.
 भोर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अक्षय गायकवाड व आरोपी देवराम लक्ष्मण माने रा. नारायणपूर ता. पुरंदर या दोघांमध्ये भोर बस स्टँड येथील स्मशानभूमी शेजारील पत्रा शेडमध्ये मद्य पित बसले होते.खिशातील पैसे काढून का घेतले या कारणावरून दोघांमध्ये वाद होऊन जोरदार हाणामारी झाली .यात आरोपी माने याने अक्षयच्या छातीवर व गुप्त अंगावर मोठे दगड मारल्याने अक्षय मोठ्या प्रमाणावर जखमी झाला होता. अक्षय यास त्याच्याच भावाने भोर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र काही वेळातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना भोर पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे ,पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, विकास लगस ,दत्तात्रेय खेंगरे, अतुल मोरे,नवले ,शिवाजी काटे, गणेश कडाळे, प्रियंका जगताप, गृहरक्षक दल भीमराव रणखांबे व आकाश सागळे यांनी सापळा रचून भोर- पुणे मार्गावरील भोलावडे येथील पेट्रोल पंपाजवळ त्वरित अटक केली.पुढील तपास पोलीस करीत आहेत.
                                             
To Top