सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी
किसनवीर कारखाना गळीतासाठी सुरु करायचा आहे त्या साठी भागभांडवल ऊभे करणे गरजेचे आहे ओझर्डे गाव हे सदन आहे येथील ग्रामस्थांनी अपुरे असणार्या शेअर्सची
रक्कम भरुन तो पुर्ण करावा प्रत्येकी १५ हजार
रुपयांचा विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातुन घरा घरात नवीन शेअर्स घ्यावेत या वितीरित्क मुदत ठेव म्हणून किमान १लाख ते ५० हजार रूपये देऊन ओझर्डे ग्रामस्थांनी दिड कोटी रुपये भाग भांडवल म्हणून गोळा करून देण्याची जबाबदारी पार पाडावी असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी ओझर्डे येथे आयोजित ग्रामस्थांच्या बैठकीत केले .
आ.पाटील बोलताना पुढे म्हणाले ओझर्डे येथील काहींनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला मोठ्या मताधिक्याने आमचे पॅनेलही निवडुन आणले २०० कोटी रुपये कर्ज असणार्या किसनवीर साखर कारखान्याचे मला चेअरमन केले पण येथील जबाबदारी फारच मोठी आहे मला वाई खंडाळा महाबळेश्वर या तीन तालुक्यातील लोकांनी तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिले तीनही तालुक्यातील असणारे विविध प्रकारचे प्रश्न सोडविण्या साठी मी रात्रीचा दिवस केला .राजकारणात मी फार सुखी होतो असे असताना नवीन जबाबदारी किसनवीर कारखान्याची तुम्ही सोपवली २०० कोटीचे असणारे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न आज माझ्या समोर आहे दुसरे आव्हान कारखाना वेळेत सुरु करण्याचे आहे २०० कोटीचे कर्ज कारखान्या वर असल्याने इतर कुठल्याही बॅंका कर्ज देण्यास तयार नाहीत.
मागच्या दोन वर्षांपासून शेतकर्यांची ५७ कोटी रुपये कारखाना देणे आहे असे असताना मागच्या चेअरमनने कारखाना निवडणूक काळात सभासदांची दिशाभुल करण्या साठी कारखाना सुरू करुन काहीच साध्य केले नाही उलट अधिकचा कर्जाचा डोंगर उभा करुन ठेवला आहे .कारखान्या वर सर्व खात्यांचे प्रमुख आणी कर्मचारी वर्गाची आढावा बैठक घेऊन माहिती घेतली असता कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली .इतकी भयानक परिस्थिती किसनवीरची आहे .तेथे ऊभी केलेली डिसलरी विध्दुत निर्मिती व इतर प्लांट मधुन शेतकर्यांना एकाही रुपयांचा फायदा तर झालाच नाही उलट त्या साठी ४० कोटी रुपये नाहक खर्च केले गेले त्यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे मुळात दोन डिसलरी व्यवस्थीत चालत नसताना ३ री डिसलरी काढुन कर्जाचा बोजा वाढवला मग ऊपपदार्थ
कशासाठी करायचे त्यातुन काहीच उत्पन्न आले नाही उलट कर्जाचा डोंगर वाढला आहे त्या मुळे २०० कोटीचा तोटा किसनवीर कारखान्याचा झाला आहे .एवढा मोठा पडलेला खड्डा भरून काढण्या साठी सभासदांनी सठळ हाताने भाग भांडवल गोळा करण्यास मदत करावी असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले आहे .
या वेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे संचालक किरण काळोखे रामदास इथापे संजय कांबळे बाळासाहेब वीर महादेव मस्कर शशिकांत पवार सत्यजीत वीर मधुकर भोसले विश्वजीत पिसाळ व्हॉईस चेअरमन रामभाऊ पिसाळ उदयसिंह पिसाळ लालासाहेब पिसाळ बाळासाहेब पाटील विजयसिंह पिसाळ विक्रमसीह पिसाळ चेअरमन राजेंद्र फरांदे व्हाईस चेअरमन अरविंद गुरव प्रदीप पिसाळ सुशांत कामटे सागर फाटक शशिकांत कुंभार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . या वेळी ओझर्डे ग्रामस्थांनी कोणी १ लाख तर कोणी ५० हजार रुपये देऊन किसनवीर कडे अनामत ठेव म्हणून ठेवण्याचे बैठकीत जाहीर केले आहे .