महत्त्वाची बातमी ! नोटरी वर केलेल्या साठेखतावरुन खरेदीखत करुन देण्याचे न्यायालयाचे आदेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
  नोटरी दस्ताबाबत अद्याप नागरिकामधे विशेषत: ग्रामीण भागात अनेक गैरसमज आहेत. नोटरी दस्त सहा महिने चालतो ,त्याला कायदेशीर मान्यता नसते त्यांचे पुढील प्रतिज्ञापत्रापेक्षा तहसिलदार यांचेकडे केलेले प्रतिज्ञापत्राला महत्व असते वै 
गैरसमजातून अनेक नागरिक आपल्या रकमांची अथवा कराराची नोंद करण्याचे टाळतात व पुढे आर्थीक नुकसानाला सामोरे जातात.बरेचदा गुंठेवारी कायदा  अथवा तत्सम तांत्रीक बाबीमुळे नोंदणीकृत दस्ताला अडचणी येतात अशा वेळी या  तांत्रीक अडचणी दुर  होईपर्यंत आपल्या रकमा अथवा करार सुरक्षीत करण्यासाठी भारत सरकार द्वारे अथवा राज्य शासनाद्वारे नेमलेल्या नोटरी अधिकारी समोर जर अधिकृत नोंदवुन नोटरी  दस्त केला तर त्याचा फायदा होवु शकतो हे दर्शवणारा निकाल नुकताच बारामती न्यायालयाने दिला आहे .
    बारामती तालुक्यातील विजय कृष्णराव जगताप यानी  नोटरी द्वारे  २००५ साली साठेखत करुन एक घर खरेदी केले होते .सिटी सर्व्हे ला त्या मालकाची नोंद नसल्याने खरेदीखत करुन देण्यास अडचण झाली होती .मात्र सन २०१६ साली सिटी सर्व्हेला नोंद झाल्यानंतर ही घरमालकाने नोंद करुन देण्याचे टाळले त्यामुळे जगताप यानी ॲड. जी.एम.आळंदीकर यांचे द्वारे  नोटीस पाठवुन बारामती येथील दिवाणी  न्यायालयात  खटला दाखल करणेत आला. न्यायालयाच्या परवानगीने ९००००/- च्या रकमेवर रितसर मुद्रांक भरला.  दिवाणी न्यायाधीश श्रीमती  डी .टी. जाधव यांचेपुढे चाललेल्या खटल्यात  वादी व प्रतिवादी च्या वकिलानी घेतलेल्या साक्षी,पुरावे तसेच दोन्ही वकिलानी केलेले युक्तिवाद ऐकुन आलेल्या तोंडी व लेखी पुराव्यानुसार   ॲड.आळंदीकर यानी केलेला दावा खर्चासह मंजुर करुन प्रतिवादीनी  २००५ साली नोटरी वर केलेल्या  करारनाम्यानुसार तीन महिन्यात वादीना  खरेदीखत करुन देण्याचे आदेश पारीत केले आहेत .
     नागरीकानी घ्यावी काळजी ..ॲड आळंदीकर 
अनेकदा असाही गैरसमज असतो की नोटरी द्वारे केलेले प्रतिज्ञापत्र चालत नाही वास्तवीक नोटरी ॲक्ट १९५२ नुसार नोटरी वकिलासमोर केलेले प्रतिज्ञापत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. काही ठिकाणी असे गैरसमज पसरवले जातात हे प्रतिज्ञापत्र चालत नाही हे पूर्णपणे चुक आहे या कायद्यानुसार अनेक दस्त करण्याचे अधिकार नोटरी ना दिलेले आहेत.  नोटरी वर झालेले करार व कोणतेही दस्त योग्य मुद्रांक भरल्यानंतर न्यायालयात पुराव्याकामी वाचण्याची तरतुद आहे. नागरीकानी नोटरी करताना  नोटरी दस्तावर नोटरीयल चा मुद्रांक लावला आहे का ते तपासुन घ्यावे ,अधिकृत नोटरी वकिलच त्यावर सही करत आहेत का ते ही पहावे,दोन पानामधे जोडुन शिक्का आहे का ते पहावे , आपला दस्त त्यांच्या नोंदवहीत नोंदला आहे का तेथे आपली सही आहे का ,नोंदणी दस्तावेळी आधार कार्ड नंबर दस्तावर नमुद आहे का ,साक्षीदार घेतले का ,त्यातील मजकुर वकिलानीच तयार केला आहे का ? आदी बाबी पाहुन नोटरी दस्त केला असेल तर नक्कीच  त्याला न्यायालयात महत्व राहते असे ॲड.गणेश आळंदीकर म्हणाले.
To Top