सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई.: डौलतराव पिसाळ
आसले, ता. वाई गावाच्या हददीतील वाई- पाचवड रस्त्यावर फिरती तपासणी करताना वनविभागाच्या भरारी पथकाने आरोपी सुनील महादेव थोरवे यांना मॅसी फर्ग्युसन कंपनीच्या (क्र.एम.एच.११ सी जी ८४१०) या ट्रॅक्टरमधुन आंबा प्रजातींचा लाकुडमाल ५.८६ घ.मी. विनापासी, विनापरवाना वाहतुक करीत असताना पकडला.त्यानुसार अवैध वाहतुक केल्याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर कारवाई मध्ये सुमारे सहा लाख रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास चालु आहे.
सदरची कारवाई उपवनसंरक्षक सातारा महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले, यांचे मार्गदर्शनाखाली वाई वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल मगर, वनपाल संग्राम मोरे यांनी पार पाडली.