सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील ऊडतारे गावास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकड्यात पावसाने झोडपून काढल्याने तेथील ३ शेतकर्यांच्या घरासह कडब्याच्या गंजीवर असणारे पत्र्याचे छप्पर अचानक आलेल्या वादळी वार्याच्या पावसात
ऊडुन गेल्याने अंदाजे त्यांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे .या पावसात घरावरील पत्र्याचे छप्पर ऊडुन गेल्याने गहू ज्वारी तांदूळ व इतर गृह ऊपयोगी प्रापंचीक असणार्या वस्त भिजुन मोठ्या प्रमाणात वरील तिनही शेतकर्यांचे नुकसान झाल्याने प्रपंच ऊघड्या वर पडले आहेत .
या घटनेची माहिती वाई तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार असलेल्या वैशाली जायगुडे यांना समजताच त्यांनी तातडीने ऊडतारे गावचे असलेले गाव कामगार तलाठी ऊमेश शिंदे यांना तात्काळ नुकसान ग्रस्त असलेले शेतकरी धनाजी नारायण बाबर रविंद्र दामोदर मोतलींग आणी सचिन हणमंत बाबर या तिघांच्याही घरावरील ऊडालेले पत्र्यांचे छप्पर व इतर गृह ऊपयोगी प्रापंचिक वस्तूंचे आलेल्या वादळी वार्याच्या पावसा मुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले .
निवासी नायब तहसीलदार वैशाली जायगुडे यांचे आदेश प्राप्त होताच ऊडतारे येथील नुकसान ग्रस्त शेतकर्यांच्या घटना स्थळावर गावचे गावकामगार तलाठी ऊमेश शिंदे गामसेवक खोपडे हे दोन्हीही अधिकारी वर्गांने
जाऊन झालेल्या नुकसानींचा पंचनामा करून
तो निवासी नायब तहसीलदार वैशाली जायगुडे
यांच्याकडे पुढील कारवाई साठी सुपूर्त करण्यात आला आहे .ऊडतारे गावचे नुकसान ग्रस्त शेतकर्यांचे प्राप्त झालेले पंचनामे हे नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठविण्यात येतील अशी माहिती सौ.जायगुडे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे .