भोरचा दक्षिण पट्टा अवकाळीने झोडपला : मान्सूनची हजेरी, बळीराजा सुखावला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील वीसगाव व चाळीसगाव खोरे परिसराला जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने गुरुवार दि. ९ रोजी चांगलेच झोडपले आहे.पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असल्याचे चित्र आहे.
     वीसगाव खोरे व चाळीसगाव खोऱ्यातील बळीराजाने खरिपातील पेरणीपूर्व पिकांच्या पेरणीसाठी शेती मशागत केली होती.मात्र पेरणीपूर्वीच्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली होती. अवकाळी पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला आहे .पुढील दोन ते तीन दिवस असाच पाउस झाला तर पेरण्या लवकरच सुरू होण्याचे चित्र आहे 

To Top