भोर ! आमदार संग्राम थोपटे यांची हॅट्रिक : तिसऱ्यांदा राजगड कारखान्याच्या चेअरमनपदी तर व्हा.चेअरमनपदी पोपट सुके

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
राजगड सहकारी साखर कारखाना अनंतनगर निगडे ता.भोर च्या चेअरमनपदी भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे तर व्हा.चेअरमनपदी पोपट सुके यांची बिनविरोध निवड झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी काम पाहिले.
      २०२२ ते २०२७ च्या पंचवार्षिक निवडणुकीत राजगड सहकारी पॅनलच्या १७ जागांसाठी १० संचालक बिनविरोध तर सात संचालकांनी निवडणूक लढवून विरोधकांना धूळ चारीत प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. गुरुवार दि. ९ झालेल्या चेअमन निवडणूक प्रक्रियेत आमदार थोपटे यांची चेअमनपदी तर व्हा. चेअरमपदी सुके यांची निवड करण्यात आली.यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.
चेअरमनपदाची हॅट्रिक
    सहकार क्षेत्रातील गाढा अभ्यास असल्यामुळे संचालक मंडळानी आमदार संग्राम थोपटे यांना  लगातार तिसऱ्यांदा बिनविरोध राजगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केले असल्याने थोपटे यांनी चेअरमनपदाची हॅट्रिक केली आहे
To Top