सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी पोलीस भरती, भरती सैन्य भरती यामध्ये जिद्दीने प्रयत्न करावेत. शिष्यवृत्तीचा लाभ सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी निश्चित घ्यावा. यासाठी आम्ही निश्चित सर्वतोपरी सहकार्य करु, असे प्रतिपादन खासदार श्रिनिवास पाटील यांनी काढले.
यशवंत शिक्षण संस्था वीरबाग सुरूर येथे रंगीलदास सुरतवाला ट्रस्ट व आचार्य आनंदऋषीजी पुणे ब्लड बँक यांच्यावतीने मोफत शिष्यवृत्ती अभियानातर्गत वाई तालुक्यातील गरीब व गरजवंत 40विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, पुणेचे महापौर शांतिलाल सुरतवाला, प्रमुख विश्वस्त सुरतवाला ट्रस्टचे जगमोहन सुरतवाला, निवृत्त अधिकारी सूर्यकांत दळवी आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन ॲड. निलेश डेरे यांनी केले.
याप्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक योगदान, खासदार शरदरावजी पवार साहेब यांच्या विचार- कार्याची दूरदृष्टी तसेच यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचार व विविध क्षेत्रातील कार्याचा उल्लेख करुण खासदार पाटिल यांनी उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी असणाऱ्या विविध योजना सांगीतल्या.
यावेळी मान्यवरांचा यथोचीत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षक, पालक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.