सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
खाणपट्टा मालक,खडी व क्रश सॅन्ड सप्लायर्स यांनी केलेल्या अवाजवी दरवाढीस विरोध दर्शविण्यासाठी वाईतील बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामे बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत वाई बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल सावंत,सुनील संकपाळ,विनीत पोफळे,धनंजय मांढरे,सचिन शिंदे,भरत गांधी आदींच्या उपस्थितीत असोसिएशनची बैठक झाली.बैठकीत या दरवाढीबाबत चर्चा करण्यात आली.जिल्ह्यातील फलटण, माण,खटाव आदी तालुक्यांमध्ये खडी,क्रश सॅन्ड यांचे दर वाढलेले नाहीत.
वाई,खंडाळा व महाबळेश्वर या तालुक्यांतील खाण व्यावसायिकांनी अवाजवी दरवाढ केली आहे.
याबाबत खाण मालकांना विचारले असता शासनाकडून होत असलेल्या अडवणुकीच्या धोरणामुळे दरवाढ केल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा,अन्यथा नोटाबंदी,कोरोना काळात अडचणीत आलेला बांधकाम व्यवसाय ठप्प होण्याची शक्यता आहे,अशी भीती बैठकीत व्यक्त करण्यात आली.