सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
कात्रज बोगद्याजवळ इन ससेवाडी तालुका भोर येथे या कंपनीची कार अचानक इंजिन मध्ये पेट घेतल्याने जळून जागीच खात झाली नशीब बलवत्तर म्हणून गाडीतील चौघेजण बचावले असल्याची घटना बुधवार दि. ८ सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.
पुणेहुन सताऱ्याकडे जात असताना कात्रज बोगद्यापासून बाहेर पडल्यानंतर ससेवाडी नजीक आयशर कंपनीच्या समोर संदीप उत्तम गवारे रा.वाकड (पुणे) यांच्या किया कंपनीच्या गाडीने अचानक पेट घेतला यात गाडी पूर्णतः जळून खाक झाली . गाडी विझवण्याचे प्रयत्न शर्तीने ग्रामस्थ तसेच राजगड पोलीस कर्मचारी करीत आहेत. मात्र आगीचा बंब न नसल्याने आग विझविण्यात आडथळा निर्माण होत होता.गाडी पूर्ण जळाल्याने गाडी नं.समजू शकला नाही. नशीब बलवत्तर म्हणून गाडीतील चारही प्रवासी बचावले असल्याची माहिती राजगड पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
फोटो पाठवीत आहे .