सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा ऑनलाईन निकाल बुधवार(दि.८) रोजी जाहीर केला. सोमेश्वरनगर परीसरातील सर्वच विद्यालयांचा निकाल उत्कृष्ट असून निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मु. सा. काकडे महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेत साहिल गाडे याने ८४.५० टक्के गुण मिळवून प्रथम, श्रावणी आगम ७९.६७ द्वितीय, प्रवीण फरांदे ७३.८३ तृतीय क्रमांक मिळवला.वाणिज्य शाखेत साक्षी काकडे ८५.३३ टक्के प्रथम, वैष्णवी खोमणे ७८.५० द्वितीय, परखंडे सुहानी परखंडे ७६.३३ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत विनोद वाघमारे याने ६७.३३ प्रथम, सागर वाघापुरे -६६.६७ द्वितीय, नेहा सवाने ६५.८३ तृतीय. व्यवसाय अभ्यासक्रमात मंगेश गडदे याने ५८.५० टक्के गुण मिळवत प्रथम, गौरव माने ५८.१७ द्वितीय आणि राहुल वाघमोडे ५७.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.८३, वाणिज्य शाखेचा ९८.२६, कला शाखेचा ७९.७१ आणि व्यवसाय अभ्यासक्रम ९३.०२ टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थी व सर्व शिक्षकांचे महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे, सचिव जयवंतराव घोरपडे, सहसचिव सतीश लकडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी अभिनंदन केले.
उत्कर्ष माध्यमिक विद्यालय वाघळवाडी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के तर आर्ट शाखेचा निकाल ९४. ७३ टक्के लागला. विज्ञान शाखेत वैभव भारत पाटेकर याने ७६ .८३ गुण पटकावत प्रथम, अर्जुन दामोदर बिचुकले ७१.८३ द्वितीय आणि ओम आनंद धापटे याने ७१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. आर्ट शाखेत शिवानी मंडले हिने ७४. ८३ टक्के गुण मिळवत प्रथम, ज्ञानेश्वर कचरे याने ६९. ८३ द्वितीय आणि सपना जाधव ६९.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून मुलींनी प्रथम तीन क्रमांक पटकावले आहेत. महीमा आत्माराम शिंदे हिने ७२.५० टक्के गुण मिळवत प्रथम, सोनाली संजय चव्हाण हिने ७१ द्वितीय आणि नेहा सोपान चव्हाण हीने ६६.६७ तृतीय क्रमांक मिळवला. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा ९६ टक्के लागला आहे. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा ९९.४५ टक्के निकाल लागला आहे. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.