भोर : संतोष म्हस्के स्पेशल रिपोर्ट ! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभात नेत्यांबरोबर इच्छुकांना मिळतंय आयतं व्यासपीठ : मात्र इकडे लग्न मुहूर्ताचा ठोका चुकतोय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या पार्शवभूमीवर नेते तसेच इच्छुकांना जनसंपर्क वाढविण्यासाठी लग्न समारंभ तसेच इतर सामुदायिक कार्यक्रम आयते व्यासपीठ झाले असल्याचे चित्र आहे.मात्र या नेते व इच्छुकांच्या भाषणबाजीमुळे कार्यक्रमाच्या मुहूर्ताचा ठोका चुकत आहे.
      सध्या तालुक्यातील विविध पक्षाचे नेते तसेच इच्छुक उमेदवार लग्न समारंभ ,वाढदिवस ,विविध विकास कामांचे उद्घाटन ,यात्रा, दशक्रिया विधी, साध्या कार्यक्रमांना भेटीगाठी अशा विविध कार्यक्रमातून निवडणुकीचा घाट घालीत सर्वसामान्यांपर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत.लग्न समारंभात तर सर्वपक्षीय नेते वेळेच्या अगोदरच हजेरी लावत असतात.मात्र वधू -वरांना शुभ आशीर्वाद व वऱ्हाडी मंडळींचे स्वागत करण्यासाठी अनेक नेते व इच्छुक भाषणबाजी करीत असल्याने लग्न समारंभाचा मुहूर्त निघून जात असल्याने तालुक्यातील एकही विवाह वेळेत लागला जात नाही. मात्र या सामुदायिक कार्यक्रमांचा फायदा नेते व इच्छुक उमेदवारांना जनसंपर्क वाढीसाठी चांगलाच होत आहे.तालुक्यात लग्न समारंभ व इतर सामुदायिक कार्यक्रमात नेते तसेच इच्छुकांचा निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क वाढत असल्याच्या सर्रास चित्राचा लग्न समारंभातील व-हाडी मंडळींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
------------------------
वऱ्हाडयांचे हाल तर नेते ,इच्छुकांचा वाढतोय जनसंपर्क 
उकाड्याचे  दिवस असूनही व-हडी मंडळी दिवसभर लग्न मुहूर्ताच्या वेळेसाठी लग्न मंडपात थांबून असतात तर लग्न मुहूर्ताच्या वेळेवर येणारे नेते तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्शवभूमीवरील इच्छुक मंडळी भाषणबाजीत बहुतांशी वेळ घालवीत असल्याने वऱ्हाडी यांचे होतायत हाल तर इच्छुकांचा उशिरा येऊनही वाढतोय जनसंपर्क असे लग्न मंडपातील वऱ्हाडी मंडळींकडून सांगण्यात आले.
                                    
To Top