वाई ! भुईंजच्या रायगावात चलायचा उसाच्या शेतात जुगार : पोलिसांनी १२ आरोपींच्या मुसक्या आवळत ३१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी 
भुईंज पोलिस ठाण्याच्या डिबी पथकाने रायगावच्या हद्दीतील शेत शिवारातील ऊसाच्या आडोशाला गेली कित्येक दिवसा पासून सुरु असलेल्या पत्यांच्या   ३ पानी जुगाराच्या अड्यावर सापळा लावुन छापा टाकुन  रोख रकमेसह तब्बल  ३१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमालासह १२  आरोपींना अटक करण्यात यश आले आहे .भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली डिबी पथकाने  टाकलेल्या  या छाप्या मुळे रायगाव गावासह परिसरातील गावांन खळबळ ऊडाली आहे .
           भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांनी दिलेली माहिती अशी की भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रायगाव या गावाच्या हद्दीतील शेत शिवारातील ऊसाच्या आडोशाला गेली कित्येक महिने विना परवाना पत्यांन वर ३ 
पाणी जुगाराचा डाव मोठ्या प्रमाणात चालतो
त्या मुळे हा जुगाराचा अड्या रायगावासह परिसरात नावारुपाला आला होता त्या मुळे गावा सह परिसरातील लोक ३ पानी जुगार खेळण्या साठी आवर्जून येत होती याची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांच्या पर्यंत खास खबर्या मार्फत पोहोचली .हा जुगाराचा अड्या ऊध्दस्त करण्यासाठी चंग बांधला त्यांनी डिबी पथकातील दप्तरी  रवीराज वर्णेकर सोमनाथ बल्लाळ
 प्रशांत शिंदे चंद्रकांत मुंगसे सहाय्यक फौजदार अवघडे यांना बोलावून रायगाव येथील शेत शिवारात ऊसाच्या आडोशाला सुरु असलेला पत्यावर ३ पानी जुगाराच्या अड्यावर सापळा लावुन छापा टाकण्याचे आदेश दिले होते .त्या प्रमाणे वरील डिबीच्या पोलिस पथकाने रायगाव मधील ऊसाच्या फडाच्या चौफेर मंगळवार  दि. ७ रोजी सकाळ पासून हे पथक सापळा लावुन दबा धरून बसलेले होते पण डाव रंगात येण्यासाठी पथकाने तब्बल चार तास घालवले आणी डाव रंगात येताच  अचानकच या पथकातील सर्व पोलिसांनी या जुगाराच्या अड्याला खेळाडूंना काही कळण्या आधीच वेडा टाकला पोलिस पाहताच काही खेळाडु भीती पोटी व स्वताला वाचविण्या साठीआपले मोबाईल जुगाराचे पत्ते आणी रोख रक्कम अड्यावरच सोडुन सैरा वैरा पळत सुटले पण डिबी पथकाने स्वताच्या जिवाची पर्वा न करता त्यांचा चित्त थरारक सिनेस्टाईल पाठलाग करुन या सर्वांच्या मुसक्या आवळुन तब्बल १२ जनांना गजाआड करुन त्यांच्या कडुन ३१ हजार ८०० रुपयांचा मुद्दे माल जप्त करुन त्यांच्या वर गुन्हा दाखल केला आहे .
           डिबी पथकाचे सोमनाथ बल्लाळ रवीराज वर्णेकर प्रशांत शिंदे हे गेली कित्येक महिन्या पासुन येथील जुगार अड्डा ऊध्दस्त करण्या साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते तरीही तो  सापळा सस्सेस होत नव्हता अखेर आज हा लावलेला सापळा तब्बल १२ जणांना गजाआड करु शकल्याचा आनंद डिबी पथकाच्या चेहर्यावर दिसत होता पोलिसांच्या या धाडसी छाप्याचे रायगाव सह परिसरातील नागरीकांनी कौतुक करुन भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांचे अभिनंदन केले आहे .
To Top