पुरंदर ! नीरा नजीक पिंपरे येथे अपघातात वाल्हे येथील दोन ठार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
 नीरा : प्रतिनिधी 
  नीरा  (ता. पुरंदर )नजीक  पिंपरे येथे  एस टी बस आणि दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार  झाले आहेत. काल दिनांक ९ जून रोजी रात्री १० वांजलेच्या सुमारास पिंपरे येथे पुणे - पंढरपूर मार्गावर  मोटार सायकल आणि एस टी बस यांच्यात जोरदार टक्कर झाली. यामध्ये सुकलवाडी येथील  विजय काळे व वाल्हे  नजीक माळवाडी येथील नाना भुजबळ यांचा मृत्यू झाला आहे. 

       पिंपरी चिंचवड ते गाणगापूर  ही बस  क्रमांक  एम एच १४ बी टी ३४६६  गाणगापूरकडे निघाली होती.  सुकलवाडीवाडी  व  माळवाडी येथे राहणारे दोघेजण मोटासायकल क्रमांक  एम एच १२ एच एच ३०७२ या मोटार सायकलवरून   सुकलवाडीकडे निघाले होते. पिंपरे येथील जया हॉटेल समोर आले असता  एस टी आणि मोटारसायकल यांच्यात धडक झाली. यामध्ये मोटार सायकलवरील दोन जण जागीच ठार झाले. घटने नंतर पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून मयत  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
To Top